पंजाब : गुरदासपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय

0

पंजाबमधील गुरदासपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड यांनी भाजपच्या स्वर्णसिंह सलारिया यांचा पराभव केला आहे.

सुमारे दीड लाख मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव झाला असून या विजयामुळे सहा महिन्यांपूर्वीच पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे.

अभिनेता विनोद खन्ना हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र एप्रिलमध्ये विनोद खन्ना यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या जागेसाठी 11 ऑक्टोबररोजी मतदान झाले होते.

LEAVE A REPLY

*