Thursday, April 25, 2024
Homeजळगावअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव – 

घरात कोणीही नसतांना अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमास शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रूपयांचा दंडा ठेठावला आहे. नरेंद्र मुरलीधर पाटील (वय-30) रा. आव्हाणी ता. धरणगाव असे आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

30 जुलै 2016 रोजी दुपारी 3 वाजता नऊ वर्षीय अल्पवयीन बालिका ही घरात एकटी असताना आरोपी नरेंद्र मुरलीधर पाटील याने तिच्या घरात येवून अल्पवयीन पिडीतेवर लैंगिक अत्याचार केले.

त्याबाबत पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून 1 ऑगस्ट 2016 रोजी पाळधी दूरक्षेत्र अंतर्गत धरणगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. 108/2016 भा.दं.वि. कलम 354 ब, 452 व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 7 व 11(1) अन्वये आरोपीविरुध्द धरणगांव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलिस निरिक्षक पी.के. सदगीर यांनी केला व दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचा खटला जळगांव सत्र न्यायालयात न्या.आर. जे. कटारिया साहेब यांचेसमोर चालला. त्यात सरकारपक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले.

त्यात पिडीत, पिडीतेची आई, दिपक बाबुराव पाटील, डॉ. विकास प्रल्हाद पाटील, डॉ. शेख असिफ इकबाल व तपासी अंमलदार पी. के. सदगीर तर आरोपीतर्फे बचावाचे साक्षीदार अंबु नामदेव सोनवणे यांना तपासण्यात आले.पिडीत अल्पवयीन मुलीची साक्ष महत्वाची ठरली.

या खटल्याचे कामी पिडीत अल्पवयीन मुलीची साक्ष ही खुप महत्वपूर्ण ठरली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने आरोपी नरेंद्र पाटील यास भा.दं.वि. कलम 354 व, 452 खाली प्रत्येकी एक वर्ष व प्रत्येकी रुपये 500 रूपयाचा दंड तर लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 7 खाली 04 वर्षे सक्तमजुरी आणि रुपये 1000 रूपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्याकामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले. याकामी पैरवी अधिकारी सपोउनि शालीग्राम पाटील यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या