विद्यापीठ अधिसभा सदस्यासाठी आज मतदान

0
तिरंगी लढत : निवडणुकीतील रंगत वाढली
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर, नाशिक, पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यासाठी आज रविवारी (दि.19) मतदान होणार आहे. विद्यापीठ प्रगती पॅनल, जयकर गु्रपप्रणित विद्यापीठ विकास मंडळ आणि सत्ताधारी एकता पॅनल यांच्यात ही तिरंगी लढत होणार आहे.
रविवार (दि.19) सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 49 हजार 700 मतदार आहेत. विद्यापीठ विकास पॅनलकडून डॉ. राजेंद्र विखे पाटील, सुनेत्रा अजितदादा पवार, संदीप कदम, अशोक सावंत हे आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर अभिषेक बोके, क्षितिज घुले, प्रकाश पाटील, अनिल विखे, संदीप शिंदे, युवराज नरोडे, भाग्यश्री कानडे, हेमंत दिपोळे, मनिषा कमानकर आणि प्रल्हाद बर्डे निवडणूक रिंगणात आहेत.
विद्यापीठ विकास मंडळाकडून पदधीधर मतदारसंघातून बस्ते बाकेराव विठोबा, करडक भारत गंगाधर, लांडे योगेश मधुकर, अनुसूचित जाती प्रवर्गातून चिंधे सुभाष निवृत्ती, भटके विमुक्त प्रवर्गातून खाडे अमोल बाबासाहेब, महिला राखीव गटातून इनामदार तबस्सुम शौकत निवडणूक लढवित आहेत. तर सत्ताधारी एकता पॅनलकडून प्रसेनजीत फडणवीस बापूसाहेब गायके, राजू पानमंद, तानाजी वाघ, बागोजी मंठाळकर, विश्‍वनाथ पाडवी, दादाभाऊ शिनकर, शशिकांत तिकोटे, विजय सोनवणे निवडणूक रिंगणात आहेत.

आज रविवारी मतदान झाल्यानंतर पुढील सोमवारी 27 तारखेला विद्यापीठातच मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर मत मोजणीसाठी आठ दिवसांचा कालवधी कशासाठी असा सवाल नगरचे उमदेवार प्रा. सुभाष चिंधे यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. या आठ दिवसांत झालेल्या मतदानात फेरफार होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*