Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज दिवसभरात 102 रुग्ण करोना पॉझिटिव्ह

पुण्यात आज दिवसभरात 102 रुग्ण करोना पॉझिटिव्ह

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरात सोमवारी दिवसभरात 102 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 49 रुग्णांना डिस्चार्ज देण्य आला असून पाच करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण मृत्यूची संख्या 199 इतकी झाली आहे.
दरम्यान, 148 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3598 इतकी झाली आहे तर आजपर्यंतच एकूण 1800 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 1599 इतकी आहे. सोमवारी 1419 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, संध्याकाळी सहापर्यंत पुणे विभागातील 2 हजार 275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 744 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 2 हजार 233 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 177 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयाती 4 हजार 123 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 14 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या1 हजार 903 आहे. कोरोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 166 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 122, सोलापूर जिल्ह्यात 12, कोल्हापूर जिल्ह्यात 8, सातारा जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 138 कोरोना बाधीत रुग्ण असून 69 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 67 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील390 कोरोना बाधीत रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 214 आहे. कोरोना बाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 50 कोरोना बाधीत रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 17 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 43 कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 32 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण – पुणे विभागामध्ये 10 मे 2020 पासून ते 18 मे 2020 पर्यंत परदेशातून एकूण 476 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या