Type to search

पुणे : बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुणे : बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या

Share

पुणे : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने पुण्यातील नवी सांगवी भागातील समर्थनगरमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.

ऋषीकेश विलास पांचाळ (वय १७, रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. ऋषिकेशने बारावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेत तो नापास झाला. या नैराश्यातून त्याने समर्थनगर येथील राहत्या घरी छताच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

दुपारी सव्वातीनच्या सुमारास घटनेची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऋषिकेशला उपचारासाठी औंध रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!