Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरींग आता महिलांच्या हातात

Share

पुणे : महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. आता मात्र हे चित्र बदलणार आहे. एसटी महामंडळाने बसचे स्टेअरींग आता महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात १६३ महिला चालक तथा वाहकांची निवड करण्यात आली आहे.

या महिलांना पुणे येथे आज झालेल्या समारंभात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन त्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या महिला बसचालक तथा वाहकांना आता एसटी महामंडळामार्फत एक वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

त्यानंतर या महिला प्रत्यक्ष रस्त्यावर एसटीची बस चालविताना दिसतील. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला देशातील अशा स्वरुपाचा हा पहिला उपक्रम आहे.

कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या महिला जेव्हा एसटीची बस चालवू लागतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!