पुणे येथे सुरु होणार खेळांचे विविध प्रकार सांगणारी स्पोर्टस्‌ नर्सरी

0

पुणे । खेळाच्या वेगवेगळे प्रकार एकत्र आणण्यासाठी स्पोर्टस्‌ नर्सरीची सुरवात आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत पुण्यामध्ये करण्यात आली. या स्पोर्टस्‌ नर्सरीमुळे क्रीडा क्षेत्रात पहिले पाऊल टाकण्यापासून तर ते क्रीडा क्षेत्रात उच्च स्तरीय कामगिरी करण्यापर्यंत सर्वांना या नर्सरीमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे.

या स्पोर्टस्‌ नर्सरीचे उद्घाटन आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती टेनिसपटू अंकिता रैना तसेच, ऑलंपिकपटू बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानिटकर आणि ऑलंपिकपटू मुष्टियोध्दा मनोज पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पोर्टस्‌ नर्सरीविषयी अधिक माहिती देताना स्पोर्टस्‌ नर्सरीचे मेंटॉर महेंद्र गोखले आणि सुंदर अय्यर यांनी सांगितले की, अशाप्रकारची ही पहिलीच स्पोर्टस्‌ नर्सरी असून याचे कार्य पीवायसी हिंदू जिमखाना आणि निगडी प्राधिकरण या ठिकाणी प्रामुख्याने सुरू होणार आहे. अशाप्रकारच्या 25स्पोर्टस्‌ नर्सरी या वर्षाअखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*