Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना वाढला : पुण्यात शाळा, महाविद्यालये बंद

कोरोना वाढला : पुण्यात शाळा, महाविद्यालये बंद

पुणे

कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक कठोर निर्णय घेतले आहे.

- Advertisement -

पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही लग्नाला परवानगी नाही, असेही सांगण्यात आले आहे.

असे असतील निर्बंध

“करोना बाधितांची रुग्णसंख्या सुरुवातीच्या काळात ४ टक्के होती. आता १० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये २८ फेब्रवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे अभ्यासिका वर्ग ५० टक्के क्षमतेने चालविण्यात यावेत. तसेच रात्री ११ पर्यंतच हॉटेल सुरू ठेवता येणार असून, ११ ते ६ पर्यन्त संचार बंदी ठेवण्यात येणार आहे. मात्र या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या वाहतूक करणार्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या