आज आनंदाचा दिवस पण… : राज ठाकरे
Share

पुणे : अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी सोशल मीडियात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे.
देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो . ते पुढे म्हणाले कि, लवकरात लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी. आणि रामराज्य देखील यायला हवं. न्यायालयाचा हा निर्णय ऐकायला बाळासाहेब हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता, अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.