Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी

Share

पुणे : राज्यात काल ढगाळ वातावरणानंतर रात्री पुणे शहरात मुसळधार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.

दरम्यान विधानसभेचे मतदान काल दिवसभर ढगाळ वातावरणात पार पडले. सायंकाळी पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील अनेक सोसायटींमध्येही पाणी घुसले आहे.

अनेक ठिकाणी पावसाच्या पाणी साचल्याने नागरिक तसेच वाहनधारकांना मनस्ताप शान करावा लागला. तर काही ठिकाणी नाल्यात देखील पूर आल्याने तेथील दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडल्या.

पुण्यासोबतच काल रात्री मुंबई शहरामध्येही वीजांच्या कडकडाटासह, मेघगर्जना झाल्या. अशातच तासभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!