जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने ७ नगरसेवकांना घरचा रस्ता

0

पुणे : जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये सादर न केल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या ७ नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फटका बसला आहे. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ७ नगरसेवकांचे पद रद्द केले आहे.

पद रद्द केल्याचा अहवाल सौरभ राव यांनी नगरविकास विभागाला कळवला आहे. वेळीच या कागदाची पूर्तता केली असती तर या कारवाईला सामोरे जावे लागले नसते. या ७ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक हे भाजपचे आहेत. तर १ नगरसेवक राष्ट्रवादीचे तर १ नगरसेवक राष्ट्रवादी संलग्न आहेत.

किरण जठार, फरझाना मेहबूब शेख, आरती सचिन कोंढरे, कविता भारत वैरागे आणि वर्षा भीमा साठे हे ५ भाजपचे नगरसेवक आहेत. तर किशोर उर्फ बाळाभाऊ उत्तम धनकवडे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. आणि इनामदार रुक्साना शमसुद्दीन अपक्ष तरी राष्ट्रवादीशी संलग्न आहेत.

LEAVE A REPLY

*