Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

वनमहोत्सव २०१९ : झाडे लावा पण ती जगवण्याची जबाबदारीही घ्या : डॉ. प्रकाश बाबा आमटे

Share

चंद्रपूर  : आजपासून वनमहोत्सव २०१९ सुरू होतो आहे. हा एक अतिशय उत्तम उपक्रम आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टासाठी आपण नक्कीच खारीचा वाटा उचलू शकतो पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटा ही ती झाडे जगवण्याचा असेल असे मत डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले आहे.

राज्य शासनातर्फे आजपासून वनमहोत्सव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावर डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी ट्विट करीत राज्यातील नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. राज्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ‘वनमहोत्सव’ सुरु करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देतांना बाबा आमटे म्हणतात कि ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टासाठी आपण नक्कीच खारीचा वाटा उचलू शकतो पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटा ही ती झाडे जगवण्याचा असेल अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त वृक्ष लागवड करण्याचा दावा वन विभगातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान चंद्रपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आनंदवन मियावाकी उद्यानाचा वनमहोत्सवाचे उद्‌घाटन करून केला जाणार आहे. या अंतर्गत १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!