Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुणे येथे बिबट्याची सव्वा चार तास दहशत

Share

पुणे(प्रतिनिधी): पुण्यात केशवनगर या नागरी वसाहतीत बिबट्यानं दहशत निर्माण केली. व्हर्टिकल ओरीना या इमारतीत सकाळी बिबट्या घुसला होता. बिबट्याच्या हल्ल्यात आणि बिबट्याला जेरबंद करताना चौघंजण जखमी झाले. तर बिबट्याच्या भितीनं पाळणारे दोघे पडून जखमी झाले. अखेर सव्वा दहा वाजता चार तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.  

बिबट्याच्या हल्यात सत्तर वर्षीय वयोवृद्ध सुमिञा तारु या जखमी झाल्या. वयोवृद्ध महिलेच्या डोक्याला आणि हाताला जखमा झाल्या आहेत. माञ या वयोवृद्ध आजीनं बिबट्याच्या डोक्यात बादली घालून स्वःताचा बचाव केला. नुसता बचावच केला नाहीतर बिबट्याला पळून लावलं. तर बिबट्याला पकडताना तीघांवर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात वनश्रेञ वनआधिकारि बी.एस. वायकर जखमी झाले आहेत. वायकर यांच्या हाताला बिबट्यानं पंजा मारला तर प्राणी मिञ आदित्य भंडारीसह दोघेजण जखमी झाले.

केशवनगरला सकाळी सहाच्या सुमारास सुमिञा तारु या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर बिबट्या शेजारच्या चौदा मजली इमारतीत घुसला. या इमारतीचं काम नुकतेच पुर्ण झालं असून इमारतीत कोणी रहिवासी नाही. माञ या इमारती शेजारी चौदा मजली निवासी इमारत असल्यानं नागरिकांत भिती पसरली होती. अखेर वन विभाग, प्राणी मिञ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. अखेर सव्वा चार तासांनी बिबट्याला जेरबंद केलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!