Type to search

क्रीडा

टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज

Share

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना बुधवारी ९ ऑक्टोबर २०१९ रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर सकाळी ११ वाजता खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघाने या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली असून, पुणे कसोटी जिंकून मालिका विजय मिळवण्यासाठी विराटसेना सज्ज झाली आहे. भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वप्रथम विंडीज विरुद्ध २-० आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकून तिसरा विजय संपादन केला आहे.

आता विजयी चौकार मारण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर करण्यात येणार आहे. या विजयामुळे भारताला मायदेशात सलग ११ वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी मिळणार आहे .

भारतीय एकदिवसीय आणि टी २० संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला विशाखापट्टणम सामन्यात सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली होती. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उठवताना दोन्ही डावात दोन शतके ठोकून भारताच्या विजयाचा पाया रचला होता. त्याचा साथीदार मयांक अगरवालनेही शानदार द्विशतक ठोकून आपणही शानदार लयीत असल्याचे दाखवून दिले होते.

मात्र भारतीय कसोटी संघाचा सध्याचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा , कर्णधार विराट कोहली , अजिंक्य राहाणे सपशेल अपयशी ठरले होते. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची चांगली संधी आहे. शिवाय आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी आपल्या फिरकीच्या जादूपुढे आफ्रिकन फलंदाजाना अक्षरशः लोटांगण घालण्यास भाग पाडले. मोहंमद शमीनेही चांगली गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात पाच फलंदाजांची शिकार केली होती.

दक्षिण आफ्रिकेबद्दल सांगायचे झाले तर , डीन एल्गार , क्विंटन डिकॉक पैड्रीत आणि मुथुस्वामी चांगली फलंदाजी करत आहेत. पण सलामीवीर एडन माक्रम आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस धावा काढण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. तर गोलंदाजीत केशव महाराज संघासाठी हुकमी एक्का ठरत आहे. मात्र व्हार्मन फिलँडर आणि कांगिसो रबाडा , अद्याप आपली चमक दाखवू शकलेले नाहीत.

या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २८५ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत २३ फेब्रुवारी २०१७ नीचांकी धावसंख्या
हवामान : दुपारनंतर पावसाची शक्यता

सलिल परांजपे देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!