Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

आफ्रिकेवर भारताचा ऐतिहासिक विजय; कसोटी क्रमवारीत भारत अव्वलस्थानी

Share

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामन्यात भारतने विजय मिळवत मालिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. या विजयानंतर भारताने इतिहास रचून जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर खेळताना हा भारताचा सलग ११ वा कसोटी मालिका विजय आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारताने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होती. पहिल्याविजयानंतर या कसोटीत भारताचे पारडे जाड होते. पहिल्यांदा ऐतिहासिक फॉलोऑन सामन्यात भारताने एक डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवला. भारताचा दक्षिण आफ्रिका विरोधातला हा सर्वात मोठा विजय आहे.

या ऐतिहासिक विजयामुळे भारताने ४० गुण मिळवत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. तर २०० अंक मिळवणारा भारत पहिला संघ ठरला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात ६७. २ ओव्हरमध्ये १८९ धावांवर बाद केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!