Type to search

Breaking News maharashtra नाशिक

पुणे येथे हिंदी व मल्याळी अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Share

पुणे : प्रतिनिधी। दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमधील निवृत्त डॉक्टरकडून हिंदी व मल्याळी अभिनेत्रींची देहविक्री केली जात असताना पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे अटक कऱण्यात आली. दोन अभिनेत्रींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे फौजदार अनंत व्यवहारे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. सुरेश कुमार सूद (वय ७४, रा. १०८ किंग्ज अपार्टमेंट, मिरा रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नांव आहे.फौजदार अनंत व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुरेश सुद हा दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमधून सेवानिवृत्त झाला आहे. तो मुंबईतील २४ व २५ वर्षांच्या दोन हिंदी आणि मल्याळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली.

यावरून बंडगार्डन भागातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये बोगस ग्राहकद्वारे सापळा रचण्यात आला. १० हजार रुपयांची टोकन अमांऊंट देऊन पुण्यात आणण्यात आले असता त्यांना हॉटेलच्या रुम नंबर ८०१ व ८०४ मधून रेस्क्यू करण्यात आले. तर दलाल म्हणून काम करणाऱ्या डॉ. सूद याला वेटींगरुममधून अटक करण्यात आली.

आरोपी सूद याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!