Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट एक जूनपासून पुन्हा होणार सुरु

पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट एक जूनपासून पुन्हा होणार सुरु

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – करोना संकटामुळे असलेला लॉकडाऊन-4 येत्या 31 मे रोजी संपणार आहे. पण त्यानंतर काय असा प्रश्न पडलेला असतानाच पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट एक जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग पूर्ववत सुरु होत आहे. महिला आणि तरुणाईची खरेदीसाठी झुंबड उडणारी तुळशीबाग कोरोनाफ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच महिने बंद होती.

- Advertisement -

तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं. सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

तुळशीबागेतील दुकानदार व कामगारांनी दुकानांची साफसफाई सुरु केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 16 ते 18 मार्च या कालावधीत तुळशीबागेतील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त बंद पाळला होता. त्यानंतर राज्यात संचारबंदी आणि केंद्राने लॉकडाऊन जरी केला. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून तुळशीबाग बंद होती.

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे 300 दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा व्यापार्‍यांचा विचार आहे. दुकाने सुरु करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्राहकांचे तापमान तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या