पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे जाधव

0

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या राहुल जाधव यांची महापौरपदी वर्णी लागली आहे.

सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना ८०, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उपमहापौरपदासाठीही घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांनी निवड झाली.

LEAVE A REPLY

*