Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुणे : नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज यांचा अपघाती मृत्यू; दिंडीत जेसीबी घुसल्याने अपघात

Share

पुणे : पुणे सासवडला जोडणाऱ्या दिवे घाटात भीषण अपघात झाला असून यामध्ये संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज अपघातात मृत्यू झालं आहे.तर जखमींना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान अरुंद असणाऱ्या दिवे घाटातुन पुण्याकडे वारकऱ्यांची दिंडी जात असताना हा अपघात झाला. दिंडी जात असताना येथून जाणारा जेसीबी थेट दिंडीत घुसल्याने सोपान महाराज यांचा मृत्यू झाला आहे. तर एका वारकऱ्यालाही आपलं जीव गमवावा लागला आहे. अतुल महादेलव आळशी (२४) असे दुसऱ्या मृत पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. या भीषण अपघातात अपघातात १५ वारकरी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

संत नामदेव महाराजांची पालखी घेऊन जाणारी दिंडी पंढरपूर ते आळंदी अशी जात होती. ही दिंडी दरवर्षी पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करते. ही दिंडी दिवे घाटातील मुक्कामानंतर घाट उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!