Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे विभागात करोनाबाधितांची संख्या 896 वर

पुणे विभागात करोनाबाधितांची संख्या 896 वर

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हयात बुधवारी संध्याकाळी सातपर्यंत करोना बाधीत रुग्णांची संख्या 813 झाली आहे. तर 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुणे विभागातील करोना बाधीत रुग्णांची संख्या 896 झाली असून विभागात करोनाबाधीत एकुण 61 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 135 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण 700 आहेत. विभागात करोनाबाधीत एकुण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 896 बाधित रुग्ण असून 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

यापैकी पुणे जिल्हयात 813 बाधीत रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.

बुधवारपर्यंत विभागामध्ये एकुण 10 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 10 हजार 210 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे तर 507 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 264 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 896 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 865 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

पुण्यातील एकाच कुटुंबातले 15 रुग्ण करोनामुक्त
पुण्यातील एकाच कुटुंबातले 15 रुग्ण करोनाफमुक्त झाले आहेत. तीन वर्षांच्या बाळापासून 92 वर्षांच्या आजीपर्यंत सर्वांनीच करोनाफवर मात केली. संबंधित कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण कुटुंबाची करोनाफ तपासणी केली असता, एक-दोघं नाही, तर तब्बल 15 कुटुंबियांना करोनाफची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
पुण्यातील लवळेमधील सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये या कुटुंबावर उपचार सुरु होते, अखेर सर्व 15 जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. 15 जणांमध्ये तीन वर्षांचे बाळ, 92 वर्षीय आजी आणि व्हीलचेअरवरील 60 वर्षीय पोलिओग्रस्त महिलेचाही समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या