Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे जिल्ह्यात आतापर्यंत 141 कोरोनाबाधितांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 141 कोरोनाबाधितांचा मृत्यू

सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यामध्ये शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 762 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 634 आहे. तर 86 रुग्णगंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी सहापर्यंत 141 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

- Advertisement -

विभागात 2 हजार 885 बाधित रुग्ण असून 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 537 बाधीत रुग्ण असून 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 762 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1 हजार 634 आहे. तर 86 रुग्णगंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्हयात 114 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 98 आहे.

सोलापूर जिल्हयात 182 बाधीत रुग्ण असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 141 आहे.

सांगली जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 26 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 10 आहे.

कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 6 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 8 आहे.

आजपर्यंत विभागात एकुण 29 हजार 319 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 हजार 795चा अहवाल प्राप्त झाला आहे. 1 हजार 524 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 24 हजार 930 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 885 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या