Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

पुण्यात कोरोना बळींची संख्या 24 वर

Share
देशात पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्क्यांनी जास्त Pune-mortality- rate-is-2.3 per cent-higher-in- country

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोरोनाबाधित मृतांची संख्या 24 वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील आहेत. शहरात 176 , पिंपरी चिंचवड 22, ग्रामीण 12 अशी एकूण 211 रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 1 बारामती येथील आहे.
पुण्यातील कोरोनाबधितांच्या मृतांची संख्या गुरुवारी 24 वर गेली असून, त्यातील एक जण बारामती येथील भाजी विक्रेता आहे. तर उर्वरित 23 कोरोना बधितांचा मृत्यू पुणे महापालिका हद्दीत झाला आहे.त्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये 16, जिल्हा रुग्णालय 1, मंगेशकर हॉस्पिटल 1, नोबेल 2, जहांगीर 1,सह्याद्री 1 अशी रुग्णांची सांख्य आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पालिका विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्याकडून विविध पावले उचलली जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना घराबाहेर न पडता सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात एका 42 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला. त्यक़्ल श्वसन संस्थेतील जंतुसंसर्ग, अल्कोहोलिक लिवर व मधुमेहाचा विकार होता.

ससून हॉस्पिटल येथे 63 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला निमोनिआ व किडनी विकार होता. तसेच 60 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला निमोनिआ व किडनी विकार होता. ससून रुग्णालयातच असलेल्या बारामती येथील 65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला निमोनिआ विकार होता. नोबल हॉस्पिटलमध्ये 62 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला निमोनिआ,मधुमेह व बहुअवयव निकामी होते. जहांगीर हॉस्पिटल येथे 62 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह व अल्सरचा विकार होता. ससून हॉस्पिटलमध्ये 58 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला या महिलेला निमोनिआ आणि तीव्र श्वसन विकार होता.

पुणे विभागात सातारा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे विभागातील कोरोनाग्रस्त मृत्यूची संख्या 25 झाली आहे. काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुणे विभागात 53 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान, कोरोना विशानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 35 चौरस किमी. क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. एकूण 15 वॉर्डपैकी 2 वॉर्डमध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून 7 वॉर्डमधील प्रत्येकी एक प्रभागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सुमारे 10,50,000 लोकसंख्या प्रभावित झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये 4 ठिकाणी, बारामती नगरपरिषद क्षेत्रामध्ये 2 ठिकाणी व इस्लामपूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये 1 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू
शहरातील कोरोनाबाधित मृत्यूपैकी ससून रुग्णालयामध्येच सर्वाधिक मृत्यू होत आहेत. त्यामुळे ससूनविषयी लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली आहे. पण ससूनमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण खासगी रुग्णालयातून तर काही रुग्ण बाह्यरुग्ण विभागात आलेले आहेत. त्यांची प्रकृती आधीच खुप खालावलेली होती. तसेच बहुतेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच अन्य आजार होते. त्यामुळे ससूनमधील मृतांचा आकडा अधिक दिसत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरूवारी दुपारपर्यंत मृत्यूची संख्या 23 वर पोहचली असून त्यापैकी ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हून अधिक आहे. तर उर्वरित रुग्णांचा नायडू किंवा अन्य खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच कोरोना बाधित व त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्येही भीती निर्माण होऊ लागली आहे.
यापार्श्वभुमीवर बोलताना डॉ. चंदनवाले म्हणाले, ससूनमध्ये मृत्यू झालेल्या बहुतेक रुग्णांचे वय 60 च्या पुढे आहे. तसेच बहुतेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच अन्य जुनाट आजारही होते. या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयांकडून गंभीर अवस्थेत ससूनकडे पाठविले जात आहेत. तसेच काही रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. त्यावेळी काहींची प्रकृती खालावलेली असते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!