Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कारभार कोन्हीही करू शकत नाही – अमृता फडणवीस

Share

पुणे | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनशे टक्के देऊन काम केलं आहे, त्यांच्याएवढं काम ‘भूतो न भविष्यति’ कोणीही करु शकत नाही. सध्याच्या परिस्थितीला त्यांच्याइतका न्याय आणखी कोणी देऊ शकत नाही. हे भाजप पक्षाचे नेते आणि जनतेला ठाऊक आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजप सक्षम आहे, असं मत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच, शिवसेनेला भाजपसोबत जुळवून घेण्यास अपील करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही, असंही त्या म्हणाल्या.

राज्यात सरकार स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. पुण्यात त्या एका खासगी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होत्या.

‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी १०० नाही तर २०० टक्के देऊन काम केलं आहे. त्यांच्या इतकं काम कुणीही आजवर केलेलं नाही. सध्या राज्यात जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या परिस्थितीला त्यांच्याव्यतिरिक्त कुणीही न्याय देऊ शकत नाही’, असं मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या. तसेच, फडणवीसांच्या कामामुळेच भाजपला निवडणुकांमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत, त्या दृष्टीनेच पुढील वाटचाल होईल याची मला खात्री असल्याचंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं.

शिवाय, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता स्थापन करण्यावरुन अनेक घडामोडी सुरू आहेत. भाजपशी जुळवून घ्या, अशी अपील शिवसेनेला करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही आणि माझं ते ऐकणारही नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजप ज्या स्थानी आहे, तिथे राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजप सक्षम असल्याचं सांगत राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असं अप्रत्यक्षरित्या अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!