Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

पुणे : भिंत कोसळून १७ परप्रांतीय मजूरांचा मृत्यू

Share

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्री रात्री दीड वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.

मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आणखी काही लोकही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुण्यातील बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडत होता. त्यामुळे सोसायटीचं कपाऊंड खचलं आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली.

या दुर्दैवी घटनेत १७  मजुरांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. सगळे मजूर बंगाल आणि बिहार या ठिकाणाहून आले होते अशीही माहिती मिळाली आहे.

मृतांची नावे

१) आलोक शर्मा (वय-२८), २) मोहन शर्मा (वय-२०), ३) अजय शर्मा (वय-१९), ४) अभंग शर्मा (वय-१९), ५) रवि शर्मा (वय-१९), ६)लक्ष्मीकांत सहानी (वय-३३),७) अवधेत सिंह (वय-२२), ८) सुनील सिंग(वय-३५), ९) सोनाली दास (वय-२), १०)ओवी दास (वय-६), ११)विमा दास (वय-२८) १२) पूजा देवी(वय २८) यांच्यासह इतर पाच मृतांचा यात समावेश आहे. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!