Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

मयांकच्या खेळीने सेहवाग, गांगुलीचे विक्रम मोडीत

Share

पुणे | प्रतिनिधी

तिरूअनंतपुरममध्ये द्विशतक झळकावणाऱ्या मयांक अग्रवालने पुण्यातही आपला फॉर्म कायम ठेवला. पहिल्या डावात सावध खेळ करत मयांकने शतकाला गवसणी घातली. झंझावाती खेळी करणाऱ्या मयांकने अनोखा विक्रमही आपल्या नावे केला आहे. मयांकने पहिल्या दहा डावांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. हा विक्रम करताना मयांकने सौरव गांगुली, शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग आणि चेतेश्वर पुजारा यांचे विक्रम मोडीत काढले. तर विनोद कांबळी आणि सुनील गावस्करनंतर तिसरे स्थान मिळवत मयांक विक्रमवीर झाला.

मयांकच्या कामगिरीनंतर त्याच्यवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्विटरमध्ये मयांक अग्रवाल आज ट्रेंडमध्ये दिसून आला. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मयांकवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

मयांकच्या आजच्या शतकी खेळीमुळे पुन्हा एकदा भारताची स्थिती मजबूत झाली आहे. भारताने पहिल्याच दिवशी पावणेतीनशेचा टप्पा ओलांडला आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारतानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मयांक आणि रोहितची जोडी आज मैदानात उतरली. मात्र, सलामीची जोडी फोडण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले.

रोहित शर्माने ३५ चेंडूत अवघ्या १४ धावा केल्या. कागिसो रबाडाच्या एका आत जाणाऱ्या चेंडूवर शर्माचा बळी गेला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारासोबत मयांकसोबत चांगली खेळी केली.

पुजाराने मयांकला चांगली साथ देत अर्धशतक साजरी केले. पुजारा देखील रबाडाच्याच एका चेंडूवर फसला आणि झेलबाद झाला. त्यानंतर रबाडानेच मयांकला फाफ ड्युप्लेसिसकरवी झेलबाद केले. मयांकनं १९५ चेंडूत १०८ धावा केल्या.

मयांकने मोडले हे विक्रम 

आतापर्यंत पहिल्या दहा कसोटीत सर्वाधिक धावा विनोद कांबळीच्या नावावर आहेत. कांबळीने पहिल्या दहा डावांत ८८० धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सुनील गावस्कर ८३१ धावा. चेतेश्वर पुजारा ५७०, एस. रमेश ५६९ , शिखर धवन ५३२. ५२६ वीरेंद्र सेहवाग आणि ५०४ सौरव गांगुली यांच्या नावावर हे विक्रम होते. ६०५ धावा करून मयांकने तिसरे स्थान पटकावले. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!