Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

Video : शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला ‘हा’ मराठमोळा क्रिकेटपटू

Share

पुणे | प्रतिनिधी

राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे ऐन काढणीवर आलेल्या शेतमालाचे नुकसान झाले असून बळीराजा हतबल झालेला बघायला मिळतो आहे. ओल्या दुष्काळाच्या तोंडी सापडलेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वोतपरी आपण प्रयत्न करणार असून सर्वांनीच बळीराजाच्या मदतीसाठी आपापल्या परीने जी कुठली मदत असेल ती केली पाहिजे असे मत मराठमोळा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य राहणे याने व्यक्त केले. तो पुण्यातील एका कार्यक्रमात सदानंद लेले यांनी घेतलेल्या मुलाखती मत व्यक्त करत होता.

अजिंक्य म्हणाला, “शेतकऱ्यांच्या कष्टामुळं आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं. त्यामुळं त्यांना आपण नेहमी मदत केली पाहिजे. मला जेव्हा कधी संधी मिळते. मी त्यांच्या मदतीसाठी काय तत्पर असतो. सध्या अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण आहे”, त्यांना मदतीची गरज आहे, ती केली गेली पाहिजे. मग ती मदत कुठल्याही स्वरुपात असो.

सोशल मीडियावर फक्त शेतकऱ्यांबद्दल मत व्यक्त केले जातात. मात्र, प्रत्यक्ष मदत मात्र कुणीही करत नाही सोशल मीडियातील भावना आभासी राहायला नको असेही तो याप्रसंगी म्हणाला.

अजिंक्यने याआधी सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. यावेळी अजिंक्यचा आपण ज्या भूमीत राहतो तेथील नागरिक जर संकटात असतील तर त्यांच्याप्रती असलेली समाजकारणाची भावना सर्वांचा आदर्श बनलेली दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती सांगताना अजिंक्य म्हणतो की, क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकूच असे नसते, नाणेफेक हरलो तर आपल्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेत मार्ग काढावा लागतो. तशाच परिस्थितीत शेतकरी असून त्यांनाही सध्या या ओल्या दुष्काळातून मार्ग काढावा लागणार आहे.

फक्त हतबल झालेल्या बळीराजाला आपण कुठेतरी मदतीचा हात दिला पाहिजे. कारण ‘आपल्या ताटात जे अन्न येते ते शेतकऱ्यांमुळे. शेतकरी अहोरात्र मेहनत करताता त्यानंतर आपल्याला दोन घास खायला मिळतात. मी हॉटेलमध्ये किंवा घरी कुठेही असेन तेव्हा मला जाणीव असते की शेतकऱ्यामुळं मला अन्न खायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी कर्तव्य म्हणून आपापल्या परीने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले पाहिजे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!