पुणे : आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला आग, लाखो रुपये जळून खाक

0

पुण्यातील वारजे येथील इलेक्ट्रिक दुकानात असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली.

या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे.

ही आग रात्रभर सुरु होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

तरी, एटीएममध्ये असलेली सर्व रोकड जळून खाक झाली आहे. ही रक्कम नेमकी किती होती, याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.

LEAVE A REPLY

*