Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीत आगमन

Share

पुणे : ग्यानबा तुकाराम’चा गजर करत संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर लाखो वारकऱ्यांनी तुकारामाच्या नामघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होत आज दुपारी चारच्या सुमारास निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनाला वरूणराजाने देखील हजेरी लावली. भक्तीरसात चिंब झालेली वारकरी पावसात नाहून निघाले. याच पार्श्वभूमीवर येथील भक्ती-शक्ती चौकात तुकोबांच्या पालखीच्या दर्शनासाठी शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक जमले होते.

सालाबाद प्रमाणे पालखीचा पहिला मुक्काम हा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात असेल. आकुर्डीतील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. महापालिकेच्यावतीने पालखीतळावर वारकऱ्यांच्या विश्रांतीची सोय, तसेच भाविकांना पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी विषेश व्यवस्था करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरीतील एचए कॉलनीत पहिली विश्रांती घेईल. दुपारच्या दरम्यान कासारवाडी येथे दुसरी विश्रांती, दुपारच्या जेवनासाठी दापोडी येथे थांबेल. आणि त्यानंतर शिवाजीनगरकडे प्रस्थान करेल.

संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पाटील यांच्या हस्ते पुजन
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून मुक्काम हलवून पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पदमनाभन आदींसह संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!