Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

Share

पुणे प्रतिनिधी : पुण्यातील रहाटणी भागातील ‘पुणेकर ज्वेलर्स’ या दुकानावर आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघा दरोडेखोरांनी सराफी व्यावसायिकावर गोळीबार करुन दुकानातील सोने-चांदिचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली. या घटनेत व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला आहे.

दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी) असे पायाला गोळी लागून जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सध्या सुरु आहे. तर घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गुन्हे विभागातील पोलिसांनी भेट दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांक मेहता यांचे रहाटणी कोकणे चौकातील आकाश गंगा सोसायटीमध्ये ‘पुणेकर ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. आज दुपारी एकच्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघा दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेण्याचा प्रयत्न केला. या चौघांचा दिव्यांक यांनी विरोध केला.

यादरम्यान आरोपींपैकी एकाने दिव्यांक यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी दिव्यांक यांच्या पायाला लागली आणि ते जखमी होऊन खाली कोसळले. परिस्थितीचा फायदा घेत चौघे दरोडेखोर लुटलेल्या ऐवजासह पसार झाले. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा रेकॉर्डींग बॉक्स देखील पळवून नेला.

दिव्यांक यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. तर लवकरच चोरट्यांना पकडले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!