Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनजवळ ५२ किलो ३०० ग्राम गांजा जप्त

Share

पुणे । प्रतिनिधी : पुणे सीमाशुल्क विभागाच्या अंगली पदार्थ पथकाने खडकी रेल्वे स्टेशनजवळ ५२ किलो ३०० ग्रॅम गांजा घेऊन जाणाऱ्या दोन कारसह तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक बी. पवार (ता. करमाळा, जि. सोलापूर), किरण गणपत पानकर (ता. मावळ, जि. पुणे) व सुधाकर निसर्ग कांबळे (कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मारुती स्विफ्ट गाडीसह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्याकडून ५२ किलो ३०० ग्रॅम वजनाचे २५ पाकिट गांज्या जप्त करण्यात आला आहे.

गांज्याची किंमत ५ लाख आणि दोन कारची किंमत १० लाख असे एकूण १५ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आल्याचे सीमाशुल्कचे सहआयुक्त सुहेल काझी यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!