पूनम कौर बॉलिवुडमध्ये

0
मुंबई- दाक्षिणात्य बॉम्ब अशी ओळख असलेली अभिनेत्री पूनम कौर 3 देव या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दिग्दर्शक अंकुश भट्टचा हा कॉमेडी चित्रपट 3 देव प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. पूनमने दाक्षिणात्य तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील 20 पेक्षा अधिक चित्रपटांतून आपली अभिनय प्रतिभा दाखविली आहे. आता साउथमध्ये पूनम सर्वात प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे. ती सध्या तेलुगू ऐतिहासिक टीव्ही सीरिज स्वर्ण खडगममध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

नेहमीच मधुबाला आणि दिव्या भारती यांच्याशी पूनमची सुंदरता आणि स्मित डोळयांची तुलना केली जाते. पूनमने 3 देवमध्ये राधाचा रोल साकारला आहे. यू-ट्यूबवर तिचे करण सिंग ग्रोव्हर सोबतचे निकम्मा हे गाणे फारच लोकप्रिय होत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हरची रोमँटिक पेअरिंग असून कुणाल रॉय कपूर, प्रिया बॅनर्जी, के. के. मेनन, टिस्का चोप्रा, प्रसोनजीत चॅटर्जी, रुद्रनिल घोष, विजय चौरासिया आणि रवी दुबे यांचादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या महिन्यात चिंतन राणा निर्मित व अंकुश भट दिग्दर्शित 3 देव प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

*