Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुनदचे पाणी पेटणार; पाटाने पाणी घ्या अन्यथा जलवाहिनी उखडून टाकू

Share

नाशिक । प्रतिनिधी

सटाणा शहरासाठी पुनद धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचा मुद्दा तापला असून याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.

थेट जलवाहिनीऐवजी पाटाने पाणी द्या अन्यथा जलवाहिनी उखडून फेकू, असा आक्रमक पवित्रा कळवण, देवळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी बैठकीत घेतला. त्यामुळे पुढील काळात पुनदचे पाणी पेटण्याची चिन्हे आहेत.

सटाणा शहराचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी थेट जलवाहिनी योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यास माजीमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार दीपिका चव्हाण, जि. प. सदस्य नितीन पवार, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे आदींसह सटाणा, देवळा, कळवण या तिन्ही तालुक्यांतील शेतकरी नेते उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!