Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Pulwama Attack : फुटीरवादी नेते म्हणतात.. सुरक्षा मागितलीच नव्हती

Share
श्रीनगर: जम्मू-काश्मीर सरकारने सहा फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर हुर्रियत कॉन्फरन्सची प्रतिक्रिया आली आहे. ‘सरकारने स्वत:च फुटीरतावादी नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला होता, आम्ही कधीच सुरक्षा मागितली नव्हती,’ अशी उर्मट प्रतिक्रिया मीरवाइज उमर फारुख यांच्या नेतृत्वाखालील हुर्रियत कॉन्फरन्सने दिली आहे.

मीरवाइज यांच्याबरोबरच अब्दुल गनी भट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी, शब्बीर शाह आणि फजल हक कुरेशी यांचीही सुरक्षा मागे घेतली आहे. आज (दि. 17) रात्रीपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तर यावर बोलताना फुटीरवादी नेता अब्दुल गनी भटने त्यांना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षेची गरज नसल्याचे म्हटले आहे.

माझी सुरक्षा ही काश्मिरी जनता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता आहे. मला कोणत्याही सरकारी सुरक्षेची गरज नाही, असे भट म्हणाले. दरम्यान, हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाइज यांनीही आपल्याला सुरक्षेची गरज नसून सुरक्षा काढून घेण्याची मागणी अनेकदा केली होती. हुर्रियत नेत्यांच्या ताज्या वक्तव्यांवरून लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!