Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशकात आता ‘पीयूसी’ऑनलाइन होणार

Share

नाशिक । वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी करणारी केंद्रे (पीयूसी) ऑनलाइन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या केंद्रात तपासल्या जाणार्‍या सर्व वाहनांची माहिती केंद्र सरकारच्या ‘परिवहन-वाहन’ पोर्टलला सादर करावी लागणार आहे.

दरम्यान, या पद्धतीने ऑनलाइन काम न करणार्‍या पीयूसी केंद्रांंवर कठोर कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व ‘पीयूसी’ केंद्र परिवहन विभागाच्या ‘वाहन’ प्रणालीशी जोडण्याचा निर्णय घेतला होता. एक एप्रिल 2019 मध्ये महाराष्ट्रात या निर्णयाची अंमलबजावणी झाली. मात्र, ‘पीयूसी’ केंद्र चालकांकडे त्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नव्हती. ही यंत्रणा खर्चिक असल्याने ती उपलब्ध करण्यास विलंब झाल्याने त्यास मुदत वाढ देण्यात आली होती.

मात्र, आता या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. नाशिक आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 54 पैकी आतापर्यंत 34 ‘पीयूसी’ केंद्र ऑनलाईन जोडण्यात आली आहेत. तसेच उर्वरित 20 पीयूसी केंद्र धारकांना प्रादेशिक परिवहन विभागाने एक ऑक्टोंबरनंतरचे मॅन्युअल पद्धतीने प्रदान केलेले प्रमाणपत्र कार्यालयीन कामकाजासाठी स्विकारण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले असून त्यांनी ऑनलाईन कामकाज केले नाही, त्या 20 केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन आधिकार्‍यांनी दिली आहे.

चाचणी नेमकी कसली ?
नाशिकमध्ये 54 पीयूसी केंद्र असल्याची नोंद ‘आरटीओ’कडे आहे. मात्र, या केंद्रातून दिल्या जाणार्‍या पीयूसी प्रमाणपत्रावर नेहमी प्रश्न उपस्थित होतात. वाहनातून होणार्‍या वायू उत्सर्जनाची चाचणी नेमकी कशी होते, या चाचणीमध्ये वायू उत्सर्जनाची कमाल पातळी किती ग्राह्य धरली जाते, तपासणी केल्या जाणार्‍या वाहनातील प्रत्यक्ष उत्सर्जनाचे प्रमाण किती, याची कसलीही माहिती पुढे येत नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!