Friday, May 3, 2024
Homeधुळेपरस्पर पीयूसी प्रमाणपत्र, चौघांवर गुन्हा

परस्पर पीयूसी प्रमाणपत्र, चौघांवर गुन्हा

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील साक्री रोडवरील कुंडाणे फाट्यावर आरटीओ कर्मचारी असल्याची बतावणी करत वाहनांना पीयूसी देणार्‍या चौघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

कुंडाणे फाट्यावर काल सकाळी 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास कार (एमएच-18-डी-100) उभी होती. या कारवर मागील व पुढील बाजूस इंग्रजीत आरटीओ असे लिहिले होते. तसेच कारजवळ एक जण खाकी रंगाची पँट परिधान करून शिट्टी वाजवत वाहन चालकांना थांबवत होता. आरटीओ कार्यालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करत वाहन चालकांना पीयूसी प्रमाणपत्र दिले जात होते.

याबाबत माहिती मिळताच तालुका पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी राजेंद्र कान्हू गायकवाड (वय 51, रा भिमवाडी, चितोड ता. धुळे), विशाल सुभाष थोरात (वय 24, रा. उडाणे), विजय गोरख पाटील (वय 25, रा. जावईनगर, मोराणे) यांना ताब्यात घेतले. वाहनात कॉम्प्युटर, प्रिंटर, पीयूसीच्या पावत्या, तसेच तपासणीचे यंत्र मिळून आले.

याप्रकरणी पोना रविंद्र सांगळे यांच्या फिर्यादीसह वरील तिघांसह शोभा मिलिंद बैसाणे (रा. धुळे) यांच्याविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ मोरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या