#GOOGLE : आता गुगलवर सर्च करा सार्वजनिक शौचालये!

0

ठाणे पालिकेने शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी आता थेट गुगलची मदत घेतली आहे.

त्यानुसार, शहरातील तब्बल ११ हजार २१७ सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उघड्यावर शौच करण्याऐवजी ठाणेकरांनी गुगलची मदत घेऊन सार्वजनिक शौचालयांचा लाभ घ्यावा, हा या मागचा मूळ उद्देश असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक शौचालयांना टॉयलेट लोकेटरद्वारे गुगलवर टाकले जाणार आहे.

येत्या २ आॅक्टोबरपर्यंत ही शौचालये गुगल मॅपला जोडली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*