४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
नवी दिल्ली : पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. ४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे.

तेलंगणमधील जागित्यालमध्ये ही घटना घडली आहे. हा तरुण सतत ४५ दिवस पबजी गेम खेळत होता. खाली मान घालून सतत दीड महिना गेम खेळल्याने त्याच्या मानेभोवती मांसपेशीला नुकसान झाले. मानेला त्रास झाल्याने त्याला हैदराबादमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्या तरुणाचा मृत्यू झाला.

दरम्यान, केवळ गेम खेळल्याने एखाद्याचा मृत्यू होऊ शकत नाही. या तरुणाच्या मृत्यूला अन्य कारण असू शकते, तसेच त्याला इन्फेक्शन झाले होते, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

काय आहे हा Game?

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

LEAVE A REPLY

*