Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : भरोसा सेलमार्फत पीडित महिलांना मानसिक आधार

Share

नाशिक : पोलीस यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून पीडित महिलांना विश्वास व मानसिक आधार देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस विभाग यांच्याकडून मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे आयोजित स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, भरोसा सेलअंतर्गत महिलांना मानसिक आधारासोबतच आवश्यकतेनुसार वैद्यकिय उपचार व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन करण्याचे कामही करण्यात येत आहे. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी भरोसा अत्यंत उपयोगी आहे. महिलांवरील अत्याचार कमी करून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घाण्यासाठी महाराष्ट्रातदेखील दिशासारखा कडक कायदा लागू होईल असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

सुशिक्षित असण्यासोबतच सुसंस्कृतपणा देखील गरजेचा आहे. त्यासाठी मुलांनी महिलांना सन्मानाने वागणूक देण्याचे संस्कार घरातूनच होणे गरजेचे आहे, असेही मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

श्रीमती पवार म्हणाल्या, स्त्रीच्या कर्तृत्वाला गौरवशाली इतिहास आहे. इतिहासाच्या प्रेरणेतूनच महिलांनी घराच्या जबाबदारीसह अंतराळापर्यंत झेप घेवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यातूनच स्त्रीयांनी प्रेरणा घेवून आयुष्यात सक्षमपणे उभे राहणे आवश्यक आहे.
श्रीमती हिरे म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना लपवून न ठेवता त्याला वाचा फोडावी.

त्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली असून यामार्फत पिडीत महिलांना न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चूल आणि मूल ही जबाबदारी सांभाळून महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. महिला शक्तीचा सन्मान महिला दिनापुरता मर्यादीत न ठेवता तो कायम स्वरूपी करणे आवश्यक असल्याचे डॉ. आरती सिंह यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी नाशिक ग्रामीण पोलिस कार्यालयात भरोसा सेलचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच भुजबळ नॉलेजसिटी येथे नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण सोहळाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महिलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. ‘भरोसा’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या पोलिस वाहनावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा व बॉडी वार्न कॅमेरा यांचेदेखील यावेळी उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हसते करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!