Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमानवाच्या मानसिक आरोग्यासाठी मानस मैत्र हेल्पलाइन

मानवाच्या मानसिक आरोग्यासाठी मानस मैत्र हेल्पलाइन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार; डॉ. प्रदीप जोशी करतील समुपदेशन

जळगाव  – 

- Advertisement -

सध्या कोरोना या विश्वव्यापी साथरोगाचे थैमान सुरु आहे. या आजारामुळे मानवी जीवनाच्या मूलगामी आणि दूरगामी जीवनावर परिणाम होत आहे. अनपेक्षितपणे मानवाला चिंता, नैराश्य, ताण वाढत आहे. मानवाचे मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता त्यांना मदत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानस मैत्र ही हेल्पलाईन सुरु केली आहे. नागरिकांनी हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी यांनी केले आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना घरातच कोंडले गेल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यातून त्यांना नैराश्य, चिंता, अस्वस्थता वाटणे, स्वत:ची, कुटुंबियांची काळजी वाटणे, विविध ताण येणे, एकटेपणामुळे अस्वस्थता येणे, भविष्यातील अनिश्चिततेमुळे रोजगार, आर्थिक मंदी अशा प्रश्नांनी दडपण येणे अशा तक्रारी वाढत आहे. अशा स्वरूपाच्या मानसिक अवस्थेचे पुढे गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते. त्यांना भावनिक आधार आणि धीर देण्यासाठी मानसमित्र कार्यरत असून त्यासाठी मानसमैत्र ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

प्राथमिक स्तरावर त्यांचे मनमोकळेपणाने ऐकून घेणे, त्यांना धीर देणे, गरजेनुसार समुपदेशन व आवश्यकता भासल्यास औषधोपचार अशा याच्या पायर्‍या आहेत. त्यातील भावनिक आधाराच्या टप्प्यावरच अनेक व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो.

राज्य पदाधिकारी आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर या हेल्पलाईनचे कार्य सुरु आहे. राज्यभरात एकूण 80 मानसमित्र काम करीत आहेत.

खान्देश संपर्क हेल्पलाइन

विनायक सावळे 94032 59226, डॉ.ठकसेन गोराणे 9420827924, सुरेश थोरात, 99630860759, डॉ.कल्पना भारंबे 9420787178, मिनाक्षी कांबळे 8408945680, दर्शना पवार 9075570510, विलास रायमाळे- 9657152585, दीपक लांबोळे 9604507100, सचिन पाखले 9270161352, डॉ. सुनंदा धिवरे 9820550374, रणजीत शिंदे 8275590524, चंद्रकांत जगदाळे 9766717889, समाधान पाटील 9881121101, दिलीप खिवसरा 8805487976, कोमल गायकवाड 7709874371, धीरेंद्र रावते 9284676783, किरण ईशी 9028951729, संदीप गिरासे 94234 94515, संगीता पाटील 9881586573, नंदा देशमुख 9657814387, गिरीश गायकवाड 8888808152.

- Advertisment -

ताज्या बातम्या