मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

0
मेहता यांचा आधी राजीनामा घ्या ; पृथ्वीराज चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- आरक्षणाच्या मुद्यावर आघाडी सरकार सत्तेत असतांना मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सरकार सत्तेत आल्यास ते आरक्षण रद्द करतील, असे मी सांगितले होते आणि झालेही तसेच. शेतकरी आंदोलनात ज्या प्रमाणात फूट पाडण्याचा सरकारने प्रयत्न केला. तोच प्रयत्न मराठा आंदोलनाच्या बाबतीत होईल, यासाठी मराठा आंदोलनकर्त्यांनी सरकारसोबत चर्चा करण्यापेक्षा आंदोलन करत आरक्षण मिळवावे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍या मंत्र्याला खुर्चीवर कायम ठेऊन चौकशी करायला निघाले आहेत. पण मंत्री सत्तेत असल्याने नि:पक्षपातीपणे चौकशी कशी होणार. यापेक्षा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा घ्या आणि मग न्यायालयीन चौकशी करावी. पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाउंगा, ना खाने दुंगा’ या घोषणेचे काय झाले असा सवालही चव्हाण यांनी केला.

राज्य सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे आता बाहेर येवू लागली आहेत. एकनाथ खडसेनंतर आता मंत्री मेहता यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची चौकशी करण्याची घोषणा केली. घोटाळा आहे म्हणून तर चौकशी करायला तयार झाले. पण मेहता खुर्चीवर असताना त्यांची चौकशी कशी करणार असा सवाल करून चव्हाण म्हणाले कि, चौकशी करणार असाल तर आधी मेहताना खुर्चीवरून खाली घ्या. न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाउंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली. पण त्यांच्याच पक्षाच्या राज्यातील एका-एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे बाहेर येत आहे. आधी खडसे झाले आता मेहता अजूनही काही नावे बाहेर पडणार आहेत. मेहता यांच्यावर असणार्‍या आरोपांची सखोल चौकशी व्हावी असे वाटत असेल फडणवीस यांनी त्यांचा आधी राजीनामा घ्यावा त्यांच्या सर्व फायलींची चौकशी करावी. अशी मागणी त्यांनी केली.

उत्तर प्रदेश सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी केली. त्यानंतर राज्यात शेतकर्‍यांनी आंदोलन केले. फडणवीस सरकारला राज्यात कर्जमाफी करायचीच नव्हती. मात्र घाईघाईने निर्णय घेतला पैसे कुठून आणणार. हे सरकार अद्याप स्पष्ट करू शकलेले नाही. कर्जमाफीबाबत सरकार प्रामाणिक नाही. दररोज नवनवी आदेश काढून घोषणा केलेल्या 34 हजार कोटींचा आकडा सरकारला कमी कराचा आहे, असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.कोणाला कर्जमाफी देणार याची आम्हला अजूनही माहिती नाही अशीही टीका यांनी केली. किचकट नियम लावल्याने यांना कर्जमाफी देण्याची मानसिकता नाही असे वाटत आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*