Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

आमचं सर्व मुद्यांवर एक मत – पृथ्वीराज चव्हाण

Share

नवी दिल्ली- काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीमधील बैठक संपली असून यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झाले असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तसेच उद्या आम्ही आमच्या निवडणुकीतील मित्रपक्षांशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करूनच महाआघाडीची अंतिम घोषणा करू आणि त्यानंतरच राज्यपालांना भेटू, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

बैठकीनंतर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या मुंबईत निवडणुकीच्या आधी आघाडीत असणार्‍या घटकपक्षांशी चर्चा करुन त्यांना माहिती देणार असल्याचे सांगितले. यामुळे येत्या दोन-तीन दिवसात राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचं नवं सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील 6, जनपथ येथील निवासस्थानी कालपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरू असलेली मॅरेथॉन बैठक आज अखेर संपली आहे. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मीडियासमोर येऊन या बैठकीची माहिती दिली. आज दोन्ही काँग्रेसची दुसरी बैठक पार पडली. त्यात सर्व मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. त्यामुळे आता आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. उद्या मुंबईत गेल्यावर आमच्या आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा करू. त्यांना संपूर्ण तपशील दिला जाईल. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!