Type to search

सार्वमत

‘पृथ्वी’मध्ये सापडली 19 लाख 50 हजारांची मुदतबाह्य कीटकनाशके

Share

तपासणी पथकाचा अहवाल तयार ः आज वरिष्ठांकडे सादर करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुदत संपलेल्या कालबाह्य कीटकनाशकांचे लेबल बदलून ते विक्रीसाठी पाठविणार्‍या नगरमधील पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेसमध्ये तब्बल 19 लाख 50 हजार रुपयांची मुदत संपलेली कीटकनाशके सापडली आहेत. यात 18 लाख रुपयांच्या मुदत संपलेल्या आणि दीड लाख रुपयांच्या कीटकनाशकांचे लेबल बदलण्यात आले असल्याचे तपासणी पथकाला आढळून आले आहे.

गेल्या आठवड्यात नगरच्या मार्केट यार्डमधील पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेसमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके यांचे लेबल बदलून त्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने गोपनीय पध्दतीने माहिती घेत मार्केट यार्डमधील पृथ्वी अ‍ॅग्रोच्या गोडावूनवर छापा मारला. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य कीटक नाशकांचा साठाच सापडला आहे. याची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाचे दहा जणांचे पथक दोन दिवस कष्ट घेत होते.

आता या तपासणी पथकाचा अहवाल तयार झाला आहे. यात 19 लाख 50 हजार रुपयांची मुदत संपलेली कीटकनाशके सापडली आहेत. यात 18 लाख रुपयांच्या मुदत संपलेल्या आणि दीड लाख रुपयांच्या कीटकनाशकांचे लेबल बदलण्यात आले असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पाहून कृषी विभागचे अधिकारी चक्रावले असून हा गोरखधंदा कधीपासून सुरू आहे. यापैकी किती साठ्याची विक्री झाली. याचा शोध कृषी विभाग घेणार आहेत.

दरम्यान तपासणी पथक आपला अहवाल आज जिल्हा अधीक्षक कृषी यांना सादर करणार आहेत. त्यांच्याकडून हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. अहलवानूसार पहिल्या टप्प्यात पृथ्वी अ‍ॅग्रोचा कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना रद्द करण्यात येणार असून कृषी विभागाच्या कायद्यानूसार पुढील टप्प्यात शेतकर्‍यांची फसवणूक केली म्हणून पोलीसांत स्वतंत्र फिर्याद देण्यात येणार असल्याचे तपासणी पथकाच्यावतीने सांगण्यात आले.

पृथ्वी अ‍ॅग्रोवरील कारवाई टाळण्यासाठी विविध पातळ्यावरून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. ‘पृथ्वी’ची वार्षिक उलाढाल काही शेकडो कोटी रुपयांची आहे. यामुळे या प्रकरणाला वलय निर्माण झाले असून यात काही पृथ्वीच्या बाजूने तर काही पृथ्वीच्या विरोधात उभे राहिले आहेत. दरम्यान या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हा अधीक्षक कृषी विभागातील गुणवत्ता विभागाचे प्रमुख दीपक पानपाटील यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!