Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

चांदवड : अन् बच्चू कडू म्हणाले, ‘प्रांतअधिकारी मजुराचं पोर, चांगलं काम करतंय’…आपला राग सरकारवर

Share
चांदवड (विकास काळे) | आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन म्हंटले की, अधिकारी अन् कडू यांच्यात शाब्दिक चकमक हे एक समीकरणच. शासकीय कार्यालय असो की मंत्रालय, हात उचलन्यापासून तर श्रीमुखात भडकविण्यापर्यंत बच्चू कडू कायमच चर्चेत राहिले आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चांदवडमध्ये नुकताच मुक्काम आंदोलन पार पडले. यादरम्यान, बच्चू कडू यांनी प्रांत अधिकारी कार्यालयात जाऊन जमिनीवर बसून मागण्या मान्य होईपर्यंत ठाण मांडण्याचा इशारा दिला. हजारो शेतकरी याठिकाणी उपस्थित होते.

यादरम्यान, प्रांत सिद्धार्थ भंडारे यांच्यासह अनेक अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. तेही आमदार बच्चू कडू यांच्याजवळ जाऊन जमिनीवरच बसले. यावेळी चांदवडमधील शेतकरी, अधिकारी यांच्याशी बोलत असताना ते म्हणाले, आमचा राग सरकारवर. अधिकारी प्रांत अधिकारी शेतमजुराचं पोरगं हाय, चांगलं काम करतंय, आमचे अधिकाऱ्यांशी वैर नाही.

प्रांतकार्यालयावर चालून गेलेल्या मुक्काम मोर्चात मागण्यांचे समाधानकारक उत्तरे मिळाल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे बच्चू कडू येथील प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या कार्याची प्रशंसा करताना दिसून आले.

मुक्काम मोर्चाचे वर्गीकरण साधरणपणे दोन वर्गात होते, यातील काही मागण्या राज्यस्तरावरील होत्या. तर काही चांदवड उपविभागांतर्गत. पैकी चांदवड उपविभांतर्गत येणाऱ्या बहूतांशी मागण्यांवर प्रदीर्घ चर्चेनंतर तोडगा निघाला अर्थात ही सर्व चर्चा प्रांताधिकाऱ्यानी कडू यांच्याशी आपल्या दालनात न करता जमिनीवर बसून केली.

चांदवड उपविभागांतर्गत येणारे प्रश्न मार्गी लागल्याने दुपारी चार वाजेपर्यंत तणावपूर्ण असलेले वातावरण काहीसे निवळले अन् प्रलंबित मागण्यासाठी राज्य पातळीवर चर्चा करून निर्णय देण्यासाठी कडू यांनी प्रशासनाला दोन तासांचा अवधी दिला.

चर्चेचा पहिला टप्पा अतिशय सकारात्मक पार पडल्याने ‘प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याविषयी ऐकून आहे, मजुराचं पोरगं हाय अन् गरिबीतून वर आल्याने गरिबीची जाण ठेऊन चांगलं काम करतंय’ अशा शब्दात बच्चू कडू येथील प्रांतांचे प्रसन्न मुद्रेने स्तुती करताना दिसले.

मात्र, सरते शेवटी ‘चांगल्या अधिकाऱ्यांना सहकार्य आहे, पण कामचुकार अधिकाऱ्यांना टोलवलच पाहिजे’ असं सांगायला बच्चू कडू विसरले नाहीत.

प्रांताधिकाऱ्यांचा ‘तिमिराकडून तेजाकडे’ प्रवास

येथील प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे हे यापूर्वी पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी खुराड्यावजा घरात राहून जगणं अन् मजूर आई-वडिलांच हातावरच पोट अशा परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. त्यामुळेच स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी ते एक आदर्श ठरत आहे. चांदवड येथे नियुक्ती झाल्यानंतर मोफत अभ्यासिका, क्रिकेट स्पर्धा, दिव्यांग व्यक्तीसाठी सुरु असलेले कार्य व जनसामन्यांशी नाळ यामुळे ते कायमच आपल्या अभिनव उपक्रमांनी चर्चेत राहिले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!