Type to search

संगमनेर : प्रांत कार्यालयाच्या पोर्चमध्ये कारने घेतला पेट

मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर : प्रांत कार्यालयाच्या पोर्चमध्ये कारने घेतला पेट

Share

संगमनेर (प्रतिनिधी) | शहरातील नवीन नगर रोड येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीच्या पोर्चमध्ये लावण्यात आलेली मारुती सुझुकी कंपनीची ए-स्टार या चारचाकीने अचानक पेट घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकोच धावपळ उडाली.

विविध शासकीय कार्यालये असलेल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कामासाठी नागरीकांची ये-जा सुरु असते. निमगावजाळी येथील दिपक शिवाजी डेंगळे हे प्रांत कार्यालयात कामानिमित्ताने आले होते. त्यांनी खाली पोर्चमध्ये कार उभी केली. त्यानंतर ते कार्यालयात गेले. त्यानंतर 15 मिनीटातच कारने पेट घेतला.

मारुती सुझुकी कंपनीची ए-स्टार एम. एच. 17 ए. ई. 5963 या क्रमांकाच्या कारने पेट घेतल्याने परिसरातील नागरीकांनी एकच धावपळ केली.

इमारतीच्या गेटवरील कामगार महिलांनी तेथून पाण्याच्या बादल्या आणून कारवर फेकल्या. तर काही वेळात अग्नीशामन बंब
घटनास्थळी दाखल झाला. पाण्याचा प्रचंड मारा झाल्याने कारची आग विझवण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!