नेवाशाच्या विकासासाठी निधी देणार : मुख्यमंत्री

0

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – तीर्थक्षेत्र असलेल्या नेवासा शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी तसेच नेवाशातील व्यापार वृद्धीसाठी नगरपंचायतीमार्फत शहरात तीन मजली दोन भव्य व्यापारी गाळ्यांचे संकुल उभारण्यासाठी व विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना दिले. तसेच तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही आश्वासन दिले.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष, भाजपाचे सर्व नगरसेवक आणि तालुकाध्यक्ष यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नेवाशाच्या विकासासाठी विविध मागण्या केल्या. नगरविकास खाते मुख्यमंत्र्याकडेच असल्याने या मंडळींना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
नेवाशाच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये व्यापारी संकुल हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. व्यापारी संकुलाचे काम मार्गी लावू असे आश्वासन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासकरांना दिले होते. त्यानुसार आज या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन भाजपा नगरसेवकांच्या वतीने देण्यात आले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरपंचायतीला निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. तसेच नगरविकास खात्याकडे प्रस्ताव त्वरित दाखल करण्यास सांगितले. भाजपचे गटनेते सचिन नागपूरे, दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे, सुनील वाघ, डॉ. सचिन सांगळे, दत्तात्रय बर्डे, भारत डोकडे, राजेंद्र मापारी आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*