एका दिवसात संस्था नोंदणी प्रमाणपत्र द्यावे; धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

0

धर्मादाय आयुक्त डिगे यांनी राज्यभरातील सर्व धर्मादाय उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना परिपत्रकामार्फत धर्मादाय संस्था, सेवाभावी ट्रस्टच्या नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर एका दिवसात संस्था नोंदणी प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश जारी केले आहे.

नोंदणीसाठी विश्वस्तांचे अधिकृत प्रतिनिधी किंवा नियुक्त वकिलांचे म्हणणे ग्राह्य मानून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. सर्वच विश्वस्तांना कार्यालयात हजर व्हायला सांगू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

राज्यात धर्मादाय संस्था किंवा ट्रस्टच्या नोंदणी प्रक्रियेत निश्चित कालमर्यादा नसल्यामुळे अनेकदा विश्वस्तांना नोंदणीसाठी सारखे सारखे हेलपाटे मारावे लागतात.

संस्था नोंदणीसाठी विहित कागदपत्रांची पूर्तता असलेल्या प्रकरणांची छाननी तातडीने करून एका दिवसात नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.

संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अपवादात्मक परिस्थितीत नोंदणीला तीन दिवसांचा अवधी मान्य केला जाईल, असे सांगत या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

*