Type to search

Featured नाशिक

देवळा : शेतकरी कष्टकरी दिव्यांगांचा प्रशासकीय कर्मचारी संघटने विरुद्ध निषेध मोर्चा

Share

देवळा | प्रतिनिधी

दर्यापूर अमरावती येथे माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी अचानक तहसील ला भेट दिली असता तिथे एका शेतकरयाचे कामचुकार अधिकाऱ्यांमुळे काम अडलं हे निदर्शनात आल्यावर त्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असता कर्मचारी संघटना जाग्या झाल्या आणि त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या निषेधार्थ कसमादे येथील शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ जाधव, कार्याध्यक्ष किरण मोरे, शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, बागलान तालुका अध्यक्ष तुषार खैरनार, उपतालुका अध्यक्ष गणेश काकुळते, भाऊसाहेब मोरे, देवळा तालुका अध्यक्ष विनोद आहेर, कांदा उत्पादक संघटना जयदीप बदाने.

युवा अध्यक्ष बापू देवरे, भाऊसाहेब दशरथ पुरकर, अंतू पवार, शेतकरी संघटना देवळा तालुका अध्यक्ष संजय देवरे, सुभाष पवार, बाळासाहेब पवार आणि शेतकरी कष्टकरी यांनी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठिंबा दर्शविला वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असे सांगण्यात आले सदर निवेदन नायब तहसीलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!