#BondiBeach : अदानीच्या कोळसा खाणीविरोधात ऑस्ट्रेलियात ‘स्टॉप अदानी’ चळवळ

0

शनिवारी ऑस्ट्रेलियात मोठय़ा प्रमाणावर ‘अदानी एण्टरप्राइझेस’ या भारतीय कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात निदर्शने करण्यात आली.

कारमायकेल कोळसा खाण ही ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी खाण ठरली असती मात्र पर्यावरण आणि आर्थिक प्रश्नांमुळे तिला विलंब झाला आहे. क्वीन्सलॅण्ड राज्यातील खाणीमुळे ग्लोबल वॉर्मिगला हातभार लागून ग्रेट बॅरिअर रीफला धोका निर्माण होईल, असा पर्यावरणाशी संबंधित गटांचा दावा आहे.

‘स्टॉप अदानी’ चळवळ उभारण्यात आली असून त्यांनी जवळपास 45 ठिकाणी निदर्शने केली.

सिडनीतील बोण्डी किनाऱ्यावर एक हजारांहून अधिक नागरिकांनी ‘स्टॉप अदानी’ मानवी चिन्हं तयार केले होते. करदात्यांच्या पैशांतून या खाणीला अब्जावधी डॉलरचे कर्ज देण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील निम्म्याहून अधिक नागरिकांनी या खाणीला विरोध केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

*