Photo Gallery : ‘उर्स-ए-आला हजरत’ प्रसंगी दहशतवादाचा निषेध

0
नाशिक | उर्स आला हजरत मिरवणुकीला नाशिकमध्ये आज दुपारी सुरुवात झाली. सुन्नी पंथीय मुस्लीम बांधवांचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमाम अहमद रझा यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिकमधील जुने नाशिक परिसरातून ‘उर्स-ए-आला हजरत’ चे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. उर्से आला हजरत मिरवणूक समारोप प्रसंगी दहशतवादचा जाहिर निषेध करण्यात आला. त्यात काश्मीरमध्ये वहाबी फंड मुळेच दहशतवाद वाढला असल्याचे यावेळी सांगितले. आला हजरत यांनी खरा इस्लाम धर्म जगा समोर मांडला. यात हिंसेला जागा नाही.  असे सांगत मौलाना शमशोद्दीन यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी चौक मंडई ते बडी दरगाह पर्यंत जुलूस (पायी यात्रा) काढण्यात आली.  यामध्ये शेकडो भाविक सामिल होते. डोक्यावर इस्लामी टोपी व हातात झेंडा घेत हे मिरवणूक निघाली.

असा होता मिरवणूक मार्ग : चौक मंडई, बागवापुरा, कथडा, चव्हाटा, काजीपुरा, कोकणीपुरामार्गे खडकाळीवरून शहीद अब्दूल हमीद चौकातून मार्गस्थ होत पिंजारघाट रस्त्याने बडी दर्गाच्या मैदानात पोहचली. येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

*