सरकारी पक्षातर्फे मुस्तफा डोसाच्या फाशीची मागणी

0
मुंबई | 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी टाडा कोर्टात सालेमसहित 7 जणांवर गेल्या आठववड्यात निकाल देण्यात आला.
दोषी असलेल्या मास्टर माइंड मुस्तफाच्या फाशीची मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात येत आहे. 1993 साली झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. 713 जण या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाले होते तर 27 कोटीचे संपत्तीचे नुकसान झाले होते.

शुक्रवारी(दि.१६) सात आरोपींना टाडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना 2003 आणि 2010 दरम्यान अटक करण्यात आली होती.

देशात या प्रकरणातील अजूनही ३३ आरोपी फरार आहेत. डोसा हा १९९३ च्या  बॉम्ब ब्लास्ट नंतर भारतातून फरार झाला होता. २००३ साली त्याच्या साथीदारासह त्याला अटक करण्यात आली होती.

या खटल्याच्या सुनावणीचा हा दुसरा टप्पा होता. पहिल्या टप्प्यात 2007 मध्ये टाडा कोर्टाने याकूब मेमन आणि बॉलिवुड अभिनेता संजय दत्तसमवेत 100 जणांना दोषी ठरवले होते. तर 27 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*